ई-गुरुजी

दूरस्थ अध्ययन - अध्यापन करण्यासाठी वापरावयाचे अत्यंत परिणामकारक माध्यम

गुरुजीची वैशिष्ट्ये

ई-गुरुजी साठी वापरलेल्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. प्रमुख वैशिष्ट्ये अशी सांगता येतील:-

 • ई-गुरुजीसाठी वापरलेल्या तंत्रामुळे विद्यार्थी - शिक्षक ह्यांचा दुहेरी संपर्क शक्य आहे. कोरोनाच्या साथीत झूम, मीट व युट्यूब वरील व्हिडीओ ह्या तंत्रांचा अध्यापनासाठी वापर करण्यात आला. ह्या तंत्रात फक्त एकेरी संपर्क शक्य होतो.
 • प्रचलित पद्धतीत ज्या प्रमाणे शिक्षक अध्यापन करताना प्रश्न विचारतो त्याच प्रमाणे ई-गुरुजीच्य पाठात प्रश्न विचारला जातो, व्हिडीओ-पाठ थांबतो, विद्यार्थ्याने उत्तर दिले की उत्तर बरोबर की चूक हे सांगितले जाते, आवश्यक तर प्रश्नाचे उत्तर पुन्हा देण्याची संधी दिली जाते व नंतर पाठ पुढे चालू होतो.
 • ई-गुरुजीसाठी जगभर वापरात असलेल्या मुडल (Moodle) ह्या तंत्राचा वापर केला आहे.
 • ह्या तंत्राचा वापर मराठीमधे व प्राथमिक पातळीवर बहुदा प्रथमच होतो आहे.
 • घटक चाचणीची सोयही आहे.
 • चाचणीचे गुण विद्यार्थ्याला व शिक्षकाला लगेच समजतात. गुण पत्रिका लगेच तयार होते.
 • ई-गुरुजीचे पाठ विद्यार्थ्याला त्याच्या सोईच्या वेळेला पाहाता येतात, तसेच अनेक वेळ पाहाता येतात.
 • अथितींसाठी हे तंत्र माहिती करून घेण्यासाठी विनाशुल्क आहे.

चला तर, अभ्यासक्रम निवडा चित्रावर क्लिक करा, नोंदणी करा Registration आणि पाठ पहा. 

  Available courses

  ५ वी गणित

  ५ वी गणित

  ह्या अभ्यासक्रमात काय आहे ?

  • इयता 5वी च्या गणित विषयाचा सर्व अभ्यास व्हिडीओ द्वारे दिला आहे.
  • एकूण 18 पाठ आहेत. प्रत्येक पाठ अंदाचे 15 ते 20 मिनिटांचा कंटाळा येण्याचे करण नाही.
  • पाठ इंटरअ‍ॅक्टिव्ह प्रकारचे आहेत. पाठ चालू असताना प्रश्न विचारला जाईल, व्हिडीओ थांबेल तुम्ही उत्तर दिले की ते बरोबर की चूक ते कळेल, मग व्हिडीओ पुढे चालू होईल.
  • व्हिडीओ अनेक वेळा पाहाता येईल.
  • पाठ संपला की एक छोटी चाचणी आहे.

  वाचन कौशल्य

  वाचन कौशल्य

  ह्या अभ्यासक्रमात  काय आहे ?

  वाचनाच्या प्रकारांची ओळख.

  • मनोगत वाचन
  • प्रकट वाचन
  • गतिमान वाचन

  वाचनासाठी सराव पाठ आणि आकलन चाचण्या.

  वाचन कौशल्य हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल.

  आजच नोंदणी करा. 

  क्षमता चाचणी

  क्षमता चाचणी

  ह्या अभ्यासक्रमात  काय आहे?

  क्षमता मूल्यमापनाची तोंड ओळख.

  गणितातील मुलभूत क्षमतांच्या चाचण्या

  • व्यवहारी अपूर्णांकाच्या क्षमता चाचण्या.
  • दशांश अपूर्णांकाच्या क्षमता चाचण्या.
  • समीकरणाच्या क्षमता चाचण्या.
  • कोनाच्या क्षमता चाचण्या.

  क्षमतांच्या चाचण्यांचे सहायाने गणितातील आपले कच्चे दुवे कोठे आहेत ते समजाऊन घ्या.

  क्षमता चाचणी हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल.

  आजच नोंदणी करा.

  शुद्धलेखन

  शुद्धलेखन

  शुद्धलेखन हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल. 

  आजच नोंदणी करा.